सांस्कृतिक कार्य

महाराष्ट्राला इतिहासाची थोर परंपरा लाभली आहे. इतिहासाच्या परंपरेचे जतन करणे म्हणजेच महाराष्ट्राचे भवितव्य घडविणे.

संपूर्ण जगाला आपल्या राज्याची सांस्कृतिक ओळख व्हावी, त्यायोगे राज्यात पर्यटन व इतर संबंधित व्यवसायांचा विकास व्हावा हा या विभागाचा उद्देश असतो.

समृद्ध साहित्य संपदा, वैविध्यपूर्ण कला हाच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. आधुनिक माध्यमांचा उपयोग करुन तरुण पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचावा. या संस्कृतीचे जतन, प्रचार आणि प्रसार यासाठी शासन कटिबद्ध आहे.

८ वास्तूंना सांस्कृतिक वारशाचा दर्जा

राज्यभरातील ८ ऐतिहासिक वास्तूंना सांस्कृतिक वारशांचा दर्जा देण्यात आला आहे.  रत्नागिरी येथील यशवंतगड, महिपतगड, गोपाळगड, पुणे येथील संगणदुर्ग, रायगड जिल्ह्यातील मानगड, ठाण्यातील घोडबंदर गड, वाशीम येथील पोहा दरवाजा, अमरावती येथील पायरी विहीर यांचा यामध्ये समावेश आहे. 

किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संपन्नतेची प्रतीके म्हणजेच आपले गड-किल्ले दुर्दैवाने आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.  त्यांची योग्यप्रकारे डागडुजी केली जावी, ऐतिहासिक वास्तू जपल्या जाव्यात यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कामकाज विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. गड-किल्ले तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ यांची एक समिती या विभागाने स्थापन केली असून किल्ले संवर्धनात ही समिती सक्रिय पुढाकार घेईल. राज्यातील कित्येक किल्ल्यांना सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यातही सांस्कृतिक विभागाने यश मिळवले असून त्यामुळे त्यांच्या संवर्धनात खूप मोठा हातभार लागेल. 

१४ मॉडेल किल्ल्यांचा प्रस्ताव

किल्ल्यांचे ऐतिहासिक व  सांस्कृतिक महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, किल्ल्यांच्या आसपासच्या भागांमध्ये पर्यटन व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी राज्यातील १४ किल्ले मॉडेल किल्ले म्हणून विकसित करण्याची सांस्कृतिक विभागाची योजना आहे. यासाठी निवड करण्यात आलेले किल्ले आहेत : गाळणा किल्ला-नाशिक, खर्डा किल्ला-अहमदनगर, भुदरगड-कोल्हापूर, तोरणा-पुणे, शिरगाव किल्ला-पालघर, नगरधन गड-नागपूर, अंबागड-भंडारा, माणिकगड-चंद्रपूर, माहूर गड-नांदेड, पंधारा किल्ला-उस्मानाबाद, अंतुर किल्ला-औरंगाबाद, कंधार किल्ला-नांदेड, ओसा किल्ला-लातूर, धारूर किल्ला-बिडीया.

लोकमान्य महोत्सव

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 'लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सवअभियान' 'लोकमान्य महोत्सव' अतिशय उत्साहाने साजरे करण्यात आलेस्थानिक गणेशोत्सव मंडळांनी या दोन्हीही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागीहोऊन हे उपक्रम राबवण्यामागचा विभागाचा उद्देश साध्य केला

रायगड महोत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, विचार प्रभावी रूपात प्रत्यक्ष साकार व्हावेत यासाठी सांस्कृतिक कामकाज विभागाने २१ ते २४ जानेवारी, २०१६ या कालावधीत किल्ले रायगडावर रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते.  यावेळी सादर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अवर्णनीय होता. राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, छत्रपती संभाजी राजे व इतर अनेक उपस्थित या महोत्सवासाठी रायगडावर उपस्थित होते. 

कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट

 

मराठी सिनेसृष्टीतील गुणवत्ता जागतिक पातळीवरही नावाजली जावी या उद्देशाने फ्रान्समधील कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये रिंगण, वक्रतुंड महाकाय, हलाल यातीन मराठी चित्रपटांना स्थान मिळवून देण्यासाठी या विभागाने भरघोस मदत केलीआंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या फिल्म्स फेस्टिवलमध्येहे तीन सिनेमे दाखवले जावेत, जगभरातील प्रेक्षकांची वाहवा त्यांना मिळावी यासाठी त्यांच्या निर्मात्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

मराठी चित्रपटांसाठी संग्रहालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर मराठी चित्रपटांसाठी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाला भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांचे नांव देण्यात येणार आहे. मराठी चित्रपट, लघुपट, माहितीपटांचे जतन यामध्ये केले जाईल.

मराठी चित्रपट उद्योगाला चालना

 

मराठी चित्रपटांना त्यांच्या निर्मात्यांच्या मागणीनुसार मल्टीप्लेक्समध्ये हवी ती वेळ देण्यात यावी, असा आदेश सरकारने दिला आहे. मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळाव्या, यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. मुंबई हे आशियाचे मनोरंजन केंद्र व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

किल्ले स्वच्छता अभियान

राज्यभरातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून या विभागाने १०० पेक्षाही अधिक किल्ल्यांच्या साफसफाईचे काम हाती घेतले.  पुरातत्त्वशास्त्र विभाग, इतिहास तज्ञ, किल्लेप्रेमी व सामाजिक संस्थांनी या संवर्धन प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर हातभार लावला.

माहिती उपलब्ध होणार एका क्लिकसरशी

महाराष्ट्रातील लोककलेची महती देश-विदेशापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने लोककलांविषयक माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. या लोककलेची माहिती लिखित व ध्वनीचित्रफित स्वरुपात संगणकात साठविण्यात येत आहे. वेबसाईटद्वारे ती सर्वांना सहज उपलब्ध होईल.